मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन बसवण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी ठिबक सिंचन योजना राबविण्यात येत असून शेतकरी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून ठिबक सिंचन करिता 90 टक्के अनुदान मिळवू शकतात. ठिबक सिंचन योजना काय आहे, Thibak Sinchan Yojana Maharashtra अंतर्गत अर्ज कसा करायचा तसेच आवश्यक कागदपत्रे या संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये देणारी योजना तसेच शेततळे योजना आणि ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मित्रांनो शासन 2023 करिता जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ठिबक सिंचन ची वितरण करणार आहे.
ठिबक सिंचन हा शेतातील पिकाला पाणी देण्याचा असे साधन आहे, ज्याच्या माध्यमातून पाण्याची नासाडी थांबते त्याचबरोबर पिकांना हवे त्या प्रमाणात योग्य पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न वाढते परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. Thibak Sinchan Yojana 2023 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णय व लाभ वितरण प्रक्रिया याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ही महत्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी ऑनलाईन अर्ज करून अनुदान मिळवू शकतात. सुरुवातीला ठिबक सिंचन योजनेअंतर्गत देण्यात येणारी अनुदान ही केवळ 50 टक्के होते परंतु आता योजनेचे अनुदान वाढवून ती 90 टक्के केलेले आहे.
मित्रांनो जेव्हा आपण आपल्या शेतातील पिकांना पारंपारिक पद्धतीने पाणी देतो तेव्हा त्या शेतातील पिकांच्या मुळापर्यंत योग्य प्रमाणात पाणी पोहोचत नाही. एखाद्या झाडाला खूप जास्त प्रमाणात पाणी पोहोचते तर एखाद्या झाडाला खूप कमी प्रमाणात पाणी पोहोचते. त्यामुळे पिकांची वाढ ही एक समान होत नाही तसेच योग्य त्या प्रमाणात आपल्याला त्या झाडांना फळधारणा होत नसल्यामुळे उत्पन्न कमी होते.
परंतु जर आपण त्या ठिकाणी ठिबक सिंचन योजनेच्या अंतर्गत ठिबक सिंचन बसवून ठिबक सिंचन च्या माध्यमातून शेती पिकांना पाणी दिल्यास त्या पिकाला हवे असलेल्या प्रमाणात योग्य तेवढेच पाणी मिळते. त्यामुळे पिकांची वाढ योग्य प्रमाणात व समसमान होते, परिणामी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळे तेवढ्याच पाण्यात इतरही दुसरे पीक घेता येते.
वरील लिंक वरून तुम्ही ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकतात. मित्रांनो ठिबक सिंचन योजना ही राज्यात दोन योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. पहिली योजना म्हणजे महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून तर दुसरी योजना म्हणजे महाडीबीटी पोखराच्या माध्यमातून. महाडीबीटी शेतकरी पूर्ण करून राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानासाठी अर्ज करता येते. परंतु पोखरा योजनेमध्ये ज्या गावांचा समावेश आहे त्याच गावातील नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.