देव म्हणतो बाळा मी तुला विसरलो नाही,तुला मी काय म्हणतो बघायला वेळ सुद्धा नाही,मग तुझं कल्याण कसं होईल

श्री स्वामी समर्थ.
नमस्कार मित्रांनो.

आपण बघतो की काही लोक भक्ती करतात.काही वेळाने ते भक्ती करणे सोडून देतात.यावेळी वारंवार देव त्यांना मदत करत असतो.कितीही सोडून जायचा प्रयत्न केला तरी देव त्यांना नेहमी मदतच करत असतो.यावेळी एका सर्वसामान्य भक्ताला प्रश्न पडणे साहजिकच आहे की,ती व्यक्ती सोडून जात असताना देखील देव त्याच व्यक्तीला पुन्हा पुन्हा तत्त्वज्ञान का देतो.

एकदा एक स्त्री आपल्या मुलाला रव्याची खीर भरवत होती.मात्र तो मुलगा वारंवार उलटी करत होता.असे करून देखील ती माता त्या मुलाला वारंवार चमच्याने खीर भरवतच होती.शेजारीच एक व्यक्ती हे बघत होती.त्या व्यक्तीने त्या मातेला विचारले की हा मुलगा उलटी करत आहे तरी देखील तुम्ही त्याला वारंवार का भरवत आहात?

यावर त्या मातीने सुंदर उत्तर दिले.ती म्हणाली हा उलटी करत आहे मात्र त्यातील एखादा तरी अन्नाचा कण त्याच्या पोटात जात आहे.तो सर्वच बाहेर काढत नाही.त्यामुळे त्याच्या पोटात थोडे तरी अन्न जाईल.हे उत्तर ऐकून ती व्यक्ती अवाक झाली.

यातून हाच बोध घ्यायचा आहे की,आपण वारंवार देवाकडे दुर्लक्ष करूनही,देव आपल्याला नेहमीच देवाच्या वाटेवर येण्यासाठी वेगवेगळे माध्यम वापरून तो,आपल्याला त्याच्याकडे येण्यासाठी आकर्षित करतो.याचा उद्देश हाच असतो की तुम्हाला देवाचा वास मिळावा.

तुमची जी देवाला ऐकण्याची क्षमता आहे ती नेहमी जागृत रहावी.यासाठी देव तुम्हाला याना-त्या मार्गाने आकर्षित करतच असतो.केवळ तुम्हाला ग्रहण करण्याची सवय मोडू नये यासाठी तो देत असतो.त्यामुळे आपली ग्रहण करण्याची वृत्ती जागृत राहते.

त्यामुळे आपण देवाचे दास होऊन राहिले पाहिजे. देव देण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण ते चांगले घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तरच आपल्या जन्माचे कल्याण होईल.अनेकदा आपल्याला वाईट गोष्टीच जास्त आवडतात,ते चुकीचे असून यामुळे आपले नुकसानच अधिक होते.

अशाच नवनवीन अध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला लाईक करा,शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment