RTE Admission Date Extended :- विद्यार्थ्यांसाठी जी काही आरटीई प्रवेश संदर्भातील जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत होती ही मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच आरटीई 2023-24 करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिताचे मुदत वाढ देण्यात आलेले
आहे. या अंतर्गत आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू झाली आहे, आणि या शैक्षणिक योजनेअंतर्गत 2023-24 शैक्षणिक हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकांनुसार 25% आरक्षण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेले आहे
RTE Admission Date Extended
यामध्ये गरीबांच्या मुलांना मोफत इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षणासाठी ही आरटीई ऍडमिशन योजना सुरू झालेले आहे. आणि या संदर्भातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मध्ये सुरुवात झाल्यापासून पालकांना सर्वर प्रॉब्लेम येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता आले नाहीत.
यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनाने महाराष्ट्र राज्य आरटीई 25 ऑनलाईन प्रवेश मुदत वाढ देण्याबाबत आदेश जाहीर केलेले आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आरटीई ऍडमिशनची शेवटची मुदत काय आहे ?.
आरटीई ऍडमिशन 2023 शेवटची मुदत ?
आता किती दिवस मुदत वाढवण्यात आले आहे ? सन 2023-24 शैक्षणिक वर्षाकरिता आरटी २५% एडमिशन सुरुवात दिनांक 1 मार्च 2023 पासून दुपारी सुरू झाली होती. आणि तिची शेवटची दिनांक 17 मार्च 2023 ही होती.
त्यानंतर ही मुदत वाढून आता 25 मार्च 2023 रात्री बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे. शासनाने काढलेल्या आदेशानुसार या तारखेनंतर मुदत वाढ मिळणार नाही याची नोंद पालकांनी घ्यावी, या संदर्भातील अपडेट आहे.
आरटीई ऍडमिशन कोणती कागदपत्रे ?
याचबरोबर आरटीई ऍडमिशन करिता कोणती कागदपत्रे लागतात ?. किंवा आपल्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या शाळा आहे, या शाळांची यादी आणि कोणती विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. याची सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे.
असल्यास खाली दिलेला लेख संपूर्ण वाचायचा आहे. यात दिलेली संपूर्ण माहिती कागदपत्रे अतिशय आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा कसा ?, या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या माहिती वर उपलब्ध होणार आहे.