MSRTC Bus News: महिलांना आजपासून 50% तिकीटावर एसटी प्रवास सुरू; राज्यात कुठेही प्रवास करा 50 टक्के सवलतीने, महत्वाची बातमी

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने राज्याच्या 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देणारी महत्त्वपूर्ण अशी महिला सन्मान योजना ही राज्य शासनाने सुरू केलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्यानंतर आता आजपासून सर्वत्र राज्यातील महिलांना या योजनेअंतर्गत 50 टक्के सूट मिळणार आहे. या msrtc bus संदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

दिनांक 17 मार्च 2023 पासून राज्यातील महिलांना एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट लागू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक परिपत्रक काढून त्याबाबत अधिकृत माहिती दिलेली आहे.

महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत केव्हापासून मिळणार? Mahila ST Bus Savalat

17 मार्च 2023 पासून राज्यातील सर्व महिलांना एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये महिलांकरिता 50 टक्के प्रवास भाड्यात सूट असणार आहे.

राज्यातील महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येत असल्यामुळे महामंडळावर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेता योजनेची परिपूर्ती करण्यासाठी रक्कम शासनाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मिळणार आहे.

यांना मिळत आहे एसटी बस मधून मोफत प्रवास

महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील 75 वर्षे पूर्ण असणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रवास भाडे आकारण्यात येत नाही म्हणजेच मोफत प्रवास मिळत आहे. त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व महिलांना st prawas भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळत आहेत.

या महिलांना मिळेल लाभ

महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून दररोज 50 लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने 30 टक्के इतका वाटा महिलांचा असतो. म्हणजेच दररोज 50 लाख प्रवाशांपैकी पंधरा लाख प्रवासी या महिला असतात. त्यामुळे राज्यातील या महिलांना मोठा लाभ या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा होणार आहे. त्याचप्रमाणे शालेय मुली तसेच नोकरदार महिला यांनासुद्धा मोठा लाभ या st bus योजनेअंतर्गत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत बारा वर्षाखालील मुलींना तसेच महिलांना 50 टक्के प्रवास भाड्यात सूट देण्यात येत असल्यामुळे याचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा.

Leave a Comment