लेख लाडकी योजनांच्या माध्यमातुम मुलींना मिळणार 75 हजार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

lek ladki yojana  गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब, शेतकरी, महिला यांना न्याय देताना उद्योग, पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, उत्तम अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल. समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चोफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. lek ladki yojana

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये लेक लाडकी या नव्या योजनाची घोषणा करण्यात आलेली आहे. ही योजना काय आहे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेऊया.
लेक लाडकी या योजनेचा लाभ राज्यातील पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांतील कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ भेटणार आहे.

Leave a Comment