प्रधानमंत्री आवास योजना, आता सर्वांना घरे मिळणार : Pradhan Mantri Awas Yojana यादी कशी पहावी?

सर्व नागरिकांना नमस्कार, प्रधानमंत्री आवास योजना एक केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यामध्ये 1995-96 पासून स्वातंत्र्य पद्धतीने राबविली जाते. खेड्यापाड्यांमध्ये तसेच शहरामध्ये राहणाऱ्या दारिद्ररेषेखालील लोकांना कच्च्या घरातून मुक्त करून त्यांना पक्क्या घरासाठी अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

केंद्र सरकारमार्फत आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून घर खरेदी करण्याची प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे; कारण या योजनेअंतर्गत घर खरेदीसाठी केंद्र सरकार सबसिडी देते. केंद्र सरकार मार्फत मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम 2.67 लाख इतकी आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्र

 • EWS/LIG उत्पन्न प्रमाणपत्र
 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • मतदान कार्ड
 • मनरेगा कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जात प्रवर्ग प्रमाणपत्र
 • बँक पासबुक विवरण
 • स्वयंव्यवसायिक असल्याबाबतचा दाखला
 • इतर आवश्यक कागदपत्र

लाभासाठी श्रेणीनिहाय उत्पन्न आराखडा

या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी घेऊ शकतात. ज्यांचे उत्पन्न 6 लाख ते 18 लाख वार्षिक असेल अशी लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील. या उत्पन्नर्यादीला तीन श्रेणीमध्ये विभागण्यात आलेले आहे.

 1. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख असेल त्यांना आर्थिक दुर्बल विभागात समजण्यात येईल.
 2. ज्यांचे आर्थिक उत्पन्न 6 लाख ते 12 लाख वार्षिक असेल त्यांना मध्यम उत्पन्न गटात 1 समजण्यात येईल.
 3. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाखांमध्ये असेल त्यांना मध्यम गट 2 यामध्ये समजण्यात येईल.

वरील विभागलेल्या श्रेणीनुसारच नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

PM Awas यादी कशी पहावी?

 • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा.
 • वेबसाईट उघडल्यानंतर आता तुम्हाला वरील बाजूस एक पर्याय दिसेल, त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा “awaassoft” या पर्यायावर क्लिक करून ड्रॉपडाऊन मेनूमधून “Reports” या पर्यायावर क्लिक करा.
 • रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पान उघडेल यामधून तुम्हाला H. Social Audit Report हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक पर्याय दाखवला जाईल “Beneficiary Details for verification” त्यावर क्लिक करा.
 • त्यानंतर रुरल हाऊसिंग रिपोर्ट हा पेज दिसेल, यामधून डाव्या बाजूला तुम्हाला तुमचा तपशील टाकून यादी पाहता येणार आहे.
 • तपशील टाकताना राज्य, तालुका, जिल्हा, गाव, वर्ष इत्यादी माहिती निवडावी लागेल.
 • सर्व तपशील टाकून Captcha Code टाकून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल यादी दिसेल जी यादी तुम्ही PDF किंवा EXCEL फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

 • पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर (pmayms.gov.in) लॉगिन करावे.
 • त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुमची श्रेणी निवडावी.
 • श्रेणीमध्ये एलआयजी, एमआयजी किंवा इडब्लूएस या तीन श्रेणीपैकी एक श्रेणी निवडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकून अपडेट करावे.
 • फॉर्म भरत असताना आपली वैयक्तिक मूलभूत अशी माहिती काळजीपूर्वक योग्यरित्या भरावी.
 • त्यानंतर संपूर्ण फॉर्म भरणे झाल्यास तुम्हाला सबमिट बटन दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा अर्ज दाखल करावा.

टीप:- योजनेच्या अधिक सविस्तर माहिती करता किंवाच अर्जासबंधी माहितीसाठी तुमच्या गावांतील ग्रामपंचायत कार्यालयाला किंवाच तालुका पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा, धन्यवाद!

Leave a Comment