100 टक्के अनुदानावर जमीन खरेदी योजना अंतर्गत 570 एकरासाठी 11 कोटी अनुदान वाटप; 100 टक्के अनुदानावर जमीन खरेदी करण्यासाठी आजच अर्ज करा | Land Subsidy Yojana

शेतकरी बांधवानो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतमजुरांना व भूमिहीनांना जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येत आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत असून या प्रवर्गातील व्यक्तींचे जीवनमान सुधारणे तसेच यांना रोजगाराच्या तसेच जमिनीच्या माध्यमातून पैसा कमावण्याच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी महाराष्ट्र शासन ही योजना राबवित आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत 570 एकर जमिनीसाठी महाराष्ट्र शासनाने 11 कोटी रुपये अनुदान लाभार्थ्यांना वितरित केलेले आहे. या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळवायचा तसेच वितरित केलेल्या Land Subsidy Anudan Yojana Maharashtra संदर्भात थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

वेळोवेळी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील तसेच देशातील सामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना च्या माध्यमातून लाभ देण्यात येत असतो. खास करून जी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत तसेच दारिद्र रेषेखालील आहेत, अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना शासन वेळोवेळी राबवित असते.

जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान देणारी योजना कोणती? Jamin Kharedi Yojana

अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अशी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन तसेच शेतमजुरांना जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राज्यांमध्ये सुरू आहे.

योजनेअंतर्गत तीन एकर किंवा पाच एकर जमीन शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत वाटप करण्यात येते.

आतापर्यंत 11 कोटी रुपयांच्या जमिनीचे वाटप:

आतापर्यंत या दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोफत जमिनीचे वाटप करण्यात आलेले असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील दोनशे नागरिकांना 500 एकर शेत जमीन शंभर टक्के अनुदानावर तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून वितरित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यासाठी म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन मजुरांना शेत जमिनीचे मोफत वाटप करण्यासाठी सन 2022 व 23 करिता 150 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे.

100 टक्के अनुदानावर शेत जमीन कोणाला मिळेल?

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या तसेच भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतमजुरांना जमिनीचे वाटप करण्यात येते. ही योजना राबण्या मागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे या समाजाच्या घटकातील लोकांच असलेले मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन स्वतःची शेत जमीन त्यांना मिळेल.

मोफत शेत जमिनीसाठी आवश्यक कागदपत्रे Required Documents for Jamin Kharedi Anudan Yojana?

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या मोफत शेतजमीन योजना करिता तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. उत्पन्न प्रमाणपत्र

2. जातीचा दाखला

3. अर्जदार भूमिहीन व शेतमजूर असल्याबाबतचे प्रमाणपत्र

4. जर अर्जदार महिलाही परितक्त्या किंवा घटस्फोटीत किंवा विधवा महिला असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र किंवा पुरावा

5. रहिवासी

6. रेशन कार्ड

7. जमीन नसल्याबाबत इतर कागदपत्रे

100 टक्के अनुदानावर शेत जमीन मोफत मिळवण्याचा अर्ज येथे पहा

वरील कागदपत्रे तुमच्याकडे या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर शेत जमीन मिळवण्यासाठी असणे आवश्यक आहे. दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना अंतर्गत जर तुम्हाला सुद्धा शेतजमीन मोफत मिळवायची असेल तर विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज तुम्हाला सादर करावा लागेल. अर्ज कसा करायचा तसेच त्याकरिता पात्रता व संपूर्ण तपशील आपण यापूर्वीच्या लेखात जाणून घेतलेला आहे.

Leave a Comment