Karj Mafi – सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Karj Mafi : शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची सरकारची मोठी घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अशा दोन महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या शासनाकडून जाहीर करण्यातआलेल्याआहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही 2017 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग सरकार बदल झाल्यावर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली.

या दोन्ही योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. जे थकबाकीदार शेतकरी होते त्यांना महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत कर्जमाफी देण्यात आलेली होती. परंतु जे शेतकरी नियमितपणे आपला कर्जाची परतफेड करत होते त्यांना मात्र कुठलाच लाभ मिळाला नव्हता म्हणून शासनाच्या नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केलेली होती. परंतु काही ज्याच्या कठीण मुळे हे अनुदान मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता व शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. Karj Mafi

म्हणून 2017 सालीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा ते शेतकरी योजनेचे लाभापासून अजूनही वंचित राहिलेले आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत बरेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. आणि अजूनही काही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत.

अशा कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या सर्व उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला असून आतापर्यंत १२.८४ लाख पत्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरित देखील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशी घोषणा राज्य शासनाकडून अधिवेशनात करण्यात आलेली आहे. Karj Mafi

Leave a Comment