शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये राबविण्यात आलेल्या पिक विमा योजनेअंतर्गत अजून पर्यंत अनेक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 500 कोटी रुपयांचा पिक विमा जो प्रलंबित आहे तो येत्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे या pik vima update Maharashtra संदर्भातील एक महत्त्वाचा Crop Insurance update अपडेट आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्या अधिवेशनामध्ये विरोधकांच्या मार्फत शासन दरबारी पिक विम्याच्या प्रलंबित रकमे संदर्भात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली असून ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत pik vima मिळालेला नाही असा प्रलंबित पिक विमा पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळण्याची अपेक्षा लागलेली आहे.
503 कोटी पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
ज्या शेतकरी बांधवांनी pik vima yojana अंतर्गत त्यांच्या शेती पिकांचा पिक विमा हा सन 2022 मध्ये उतरवलेला होता, आणि अशा शेतकऱ्यांनी जर pik vima कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला असेल तर अशी शेतकरी पात्र असून अद्यापही ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे काहीच पैसे मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांना प्रलंबित असणारा पिक विमा पंधरा दिवसांमध्ये मिळणार आहे.
त्याचबरोबर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांकडून प्रश्न विचारताना अनेक शेतकऱ्यांची पिक विम्याची प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती तसेच पिक विमा क्लेम उशिरा करणे किंवा पिक विमा नुकसान झालेल्या असून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी केले न करणे अशा प्रकारच्या अनेक समस्या शासन दरबारी मांडल्यामुळे यावर देखील अब्दुल सत्तार यांनी तोडगा काढण्याची माहिती दिलेली आहे.
जाणून-बुजून पिक विमा न दिल्यास कारवाई होणार
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पिक विमा वाटपा संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले की, पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा पिक विमा वितरित करण्यास दिरंगाई केली किंवा जाणून बुजून पीक विम्याची वाटप न केल्यास अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
जर तुम्ही पात्र असाल तर पिक विमा कंपन्यांना तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून पिक विमा वाटप करावाच लागेल. त्याकरिता पंधरा दिवसांचा कालावधी ठरवून देण्यात आलेला असून पंधरा दिवसाच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांना विम्याचे वाटप करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना काढता येणार फक्त 1 रुपयात पिक विमा:
महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना पिक विमा योजना संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून त्यांच्या शेती पिकांचा पिक विमा काढता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरावया लागणारी पिक विमा हप्त्याची रक्कम आता शासन भरणार आहे. त्यामुळे शेतकरी केवळ एक रुपयाच्या माध्यमातून पिक विमा संरक्षण प्राप्त करू शकतील.