मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. अनेक दिवसांपासून अंगणवाडी मध्ये नोकरी मिळवू इच्छिणारे अर्जदार अंगणवाडी भरती निघण्याची वाट पाहत होते. आणि आता वेगळ्या जिल्हा मार्फत त्या त्या जिल्ह्याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी नाशिक आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती राबवण्यात आलेली होती. आणि आता सध्या पुणे या जिल्ह्याकरिता ही Anganwadi Bharti प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती अंतर्गत पदांचा तपशील तसेच अर्ज प्रक्रिया, अटी व शर्ती आणि पात्रता या संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेऊया. पुणे जिल्हा करिता एकूण 818 रिक्त जागांसाठी Anganwadi Bharti Maharashtra ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी भरती अंतर्गत नोकरी मिळू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अंगणवाडी सेविका भरती अंतर्गत कोणत्या तालुक्यासाठी तसेच गावासाठी किती जागा रिक्त आहेत यांचा सुद्धा तपशील आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत.
जर तुम्ही सुद्धा पुणे जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्हाला अंगणवाडी भरती 2023 पुणे अंतर्गत अर्ज करायचा असेल तर Mini Anganwadi Sevika तसेच Anganwadi Madatnis आणि Anganwadi Sevika या तीन पदांकरिता तुम्ही अर्ज करू शकतात. पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत जिल्ह्यात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून भरती राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
अंगणवाडी भरती पुणे माहिती Anganwadi Bharti Details
एकूण पदसंख्या: 818
पदांची नाव:
1. अंगणवाडी सेविका
2. मिनी अंगणवाडी सेविका
3. अंगणवाडी मदतनीस
वयोमर्यादा: कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्ष
शैक्षणिक पात्रता: किमान बारावी उत्तीर्ण
अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन पद्धतीने
अधिकृत वेबसाईट: https://zppune.org/pgeHome.aspx
पदाचे नाव व रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
1. अंगणवाडी सेविका | 134 पदे |
2. अंगणवाडी मदतनीस | 653 पदे |
3. मिनी अंगणवाडी सेविका | 31 पदे |
एकूण पदसंख्या | 818 |
अंगणवाडी भरती करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Anganwadi Bharti
अंगणवाडी भरती 2023 पुणे करिता तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.
1. अर्जदाराचे आधार कार्ड व रेशन कार्ड
2. रहिवासी दाखला
3. तहसील दार यांनी दिलेले नावाबाबत प्रतिज्ञापत्र
4. शाळेतील टीसी
5. गुणपत्रिका
6. कास्ट सर्टिफिकेट
7. अनुभव प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे अंगणवाडी भरती करिता आवश्यक असणार आहेत.
भरती अंतर्गत महत्वाच्या सूचना
अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती पुणे अंतर्गत अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदाराने खालील महत्वाच्या सूचना लक्षात घ्याव्यात
1. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने उमेदवाराने स्वतः भरायचा आहे.
2. अर्जासोबत सर्व प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे.
3. जर अर्जदार या Anganwadi Bharti 2023 अंतर्गत वरील तिन्ही पदांसाठी अर्ज करणार असेल तर अर्जदाराने प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा.
4. अर्ज हे अचूक पद्धतीने खाडाखोड न करता भरायचे आहे.
5. अर्ज हा पूर्ण भरायचा असून स्पष्ट अक्षराने अर्ज भरायचा आहे.
6. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड आढळल्यास किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
7. अर्ज दराने जाहिरात मध्ये नमूद केलेल्या तारखे मध्येच अर्ज सादर करायचा आहे.